Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात राष्ट्रीय संत भीमा भोई महाराज जयंती उत्साहात साजरी

* भाजपा नेते प्रणय भांडारकर यांच्याहस्ते आरती 

* समाजबांधवांकडून डिजेच्या तालावर भव्य मिरवणूक 

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे राष्ट्रीय संत भीमा भोई महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. समाजातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाज बांधवांनी एकत्र येत जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर यांनी जयंती उत्सवासाठी 21 हजार रुपयांची देणगी देत समाजकार्याला सहकार्य केले. त्यांच्या या मदतीबद्दल समाजबांधवांकडून आभार व्यक्त करण्यात आले. संध्याकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास मुन्नाभाऊ भांडारकर व सहकाऱ्यांच्या हस्ते संत भीमा भोई महाराजांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच विलास भामरे, अशोक सोन्नी, युवा नेते कडू नाना पाटील आदी उपस्थित होते. आरतीनंतर कालींका माता मंदिरापासून डिजेच्या तालावर भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतीषबाजी आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.


मिरवणुकीत युवकांनी उत्साहाने नृत्य करीत सहभाग घेतला, तर महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संत भीमा भोई महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि समाजात ऐक्य निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या जयंती सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन करण्यासाठी समाजातील पदाधिकारी व समाज बांधवांनी विशेष मेहनत घेतली. समितीचे अध्यक्ष रमेश रतन भोई, उपाध्यक्ष ईश्वर मोहन भोई, खजिनदार सचिन राजेंद्र भोई, सचिव शरद प्रकाश भोई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.


तसेच सदस्य म्हणून विलास सुकलाल भोई, बुधा भोई, रामभाऊ भोई, राकेश धोंडू भोई, भरत अरविंद भोई, रवींद्र राजू भोई, धर्मराज रामा भोई, बन्सीलाल धुडकू भोई, सागर अशोक भोई, राहुल छोटू भोई, अमोल संतोष भोई, विकास रामदास भोई, सुरेश सुकलाल भोई, सोमनाथ बुधन भोई, मंगेश राजू भोई, मनोज प्रकाश भोई, मंगेश वना भोई, दिलीप सुकलाल भोई आणि दिपक भिका भोई यांनीही सक्रिय सहभाग घेतला. समाजातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एकोप्यामुळे हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि संत विचार जपण्याचा संदेश देण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement