Type Here to Get Search Results !

शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख अविनाश आबा कुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

* राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिष्टचिंतन

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक तथा नगरदेवळा येथील शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख अविनाश (आबा) कुडे यांचा 60 वा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगरदेवळा येथील आशीर्वाद टी स्टॉल येथे सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात मित्रपरिवार, सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरदेवळा येथील माजी उपसरपंच विलास राजाराम भामरे यांनी अविनाश आबा कुडे यांचा शाल, गुलाबपुष्प देऊन तसेच पेढा भरवून सत्कार करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव उपस्थित मान्यवरांनी यावेळी केला.


अविनाश आबा कुडे यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.


याप्रसंगी राकेश बाबा थेपडे, प्रदीप भोलासिंग परदेशी, अरविंद परदेशी सर, राजू दादा परदेशी, सचिन दामू गढरी, नाना पाटील, विलास सोनवणे, रज्जाक शेख, सागर नामदेव पाटील, कडू नाना पाटील, सैफुद्दीन शेख, पत्रकार अली रजा, फारूख शेख, फिरोज पिंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement