Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची मुंबईत भेट

* खुलताबाद शहरासाठी निधीची मागणी

मुंबई- खुलताबाद / तकीउद्दीन शेख :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची मुंबई येथे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट घेण्यात आली. यावेळी खुलताबाद शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.

बारामती मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल सुनेत्राताई पवार यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी आमदार सना मलिक, खुलताबाद नगराध्यक्ष आमेर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष व नगर परिषद गटनेते गजानन पाटील फुलारे, नगरसेवक अनिस जहागिरदार, मुनुभाई शेख, एस. एम. खमर, काँग्रेस पक्षाचे गटनेते सलीमभाई शेख, तोहसीफ शेख, अयाजभाई बेग, कैलास पाटील बारगळ, वाजिद शेख, सलीम जागीरदार, फाहद मोमीन, किरण पाटील फुलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खुलताबाद शहराच्या विकासासाठी विविध योजनांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement