* खुर्शीद बी सय्यद किफायत अली यांचे निधन ; परिसरात हळहळ
* दिवाण साहेब सय्यद वजीर नूर मोहम्मद यांच्या स्नुषेचे निधन
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील ज्येष्ठ नागरिक तथा दिवाण साहेब सय्यद वजीर नूर मोहम्मद यांच्या स्नुषा खुर्शीद बी सय्यद किफायत अली यांचे बुधवार, 3 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 105 वर्षांच्या होत्या.
मागील काही महिन्यांपासून त्या वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.
खुर्शीद बी यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात कुटुंबातील अनेक पिढ्या पाहिल्या. प्रेमळ, शांत आणि धार्मिक स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मान होता. त्यांच्या निधनाने परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात मोठी मुलगी माहेरोनिस बी इस्माईल खान (वय 82), मुलगी नाजमोनिसा जमालुद्दीन खान (वय 65), पुत्र ताहेर अली किफायत अली (वय 75), तालिब अली किफायत अली (वय 66), मुन्साफ अली किफायत अली (वय 65), साबीर अली किफायत अली (वय 60) तसेच सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


Social Plugin