Type Here to Get Search Results !

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

* आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल व घुमरे मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम

कर्जत / राजेंद्र जाधव :- आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल आणि घुमरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 4 फेब्रुवारी 2026 रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत कपालेश्वर मंदिर, टिळक चौक, पोस्ट ऑफिसजवळ, कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची निवड करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास तीही सोबत आणावित, असे आयोजकांनी सांगितले.


निवड झालेल्या रुग्णांसाठी शस्त्रक्रियेसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची तसेच शस्त्रक्रियेनंतर परत आणून सोडण्याची संपूर्ण मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9373812739 किंवा 9657011101 या क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲंड. करण घुमरे, बिनिता घुमरे आणि बळवंत घुमरे यांनी केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement