Type Here to Get Search Results !

15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

* नराधम आरोपीला अटक : जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल, बाल कल्याण समितीसमोर उघडकीस आला प्रकार

जळगांव / प्रतिनिधी :- शहरातील जैनाबाद भागात एका 15 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेऊन, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी आहे. डिसेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिला फूस लावून तिच्या राहत्या घरून पळवून नेले. त्यानंतर जैनाबाद येथील स्वतःच्या राहत्या घरात डांबून ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.


हा संपूर्ण प्रकार जळगाव येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या 34 वर्षीय आईने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार 4 जून 2026 रोजी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला.


फिर्याद दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवून संशयित आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (रा. जैनाबाद, जळगाव) याला 4 जून 2026 रोजी सायंकाळी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत. या अमानुष घटनेमुळे जळगाव शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement