Type Here to Get Search Results !

आयपीएल 2026 : सलग दुसऱ्यांदा आरसीबी चॅम्पियन

* विजेतेपदासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 20 कोटींची कमाई ; उपविजेत्या गुजरात टायटन्सलाही 12.5 कोटींचे बक्षीस

अहमदाबाद / प्रतिनिधी :- आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

विजेतेपदासह आरसीबीवर बक्षीस रकमेचाही वर्षाव झाला असून संघाला तब्बल 20 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम मिळाली आहे. उपविजेता ठरलेल्या गुजरात टायटन्सलाही 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. आयपीएल 2026 मध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या सर्व संघांना आकर्षक बक्षीस रक्कम देण्यात आली.


* बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे :- 

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (विजेता) - 20 कोटी रुपये

- गुजरात टायटन्स (उपविजेता) - 12.5 कोटी रुपये

- सनरायझर्स हैदराबाद (तृतीय क्रमांक) - 7 कोटी रुपये

- राजस्थान रॉयल्स (चतुर्थ क्रमांक) - 6.5 कोटी रुपये


* वैभव सूर्यवंशीचा पुरस्कारांवर दबदबा :- या हंगामात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने अनेक वैयक्तिक पुरस्कारांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

* पुरस्कार आणि बक्षीस रक्कम :- 

- ऑरेंज कॅप - 10 लाख रुपये

- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP) - 15 लाख रुपये

- इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन - 10 लाख रुपये

- सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार - 10 लाख रुपये


* रबाडाने पटकावली पर्पल कॅप :- गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी करीत पर्पल कॅप जिंकली. त्याला या पुरस्कारासाठी 10 लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.


* आरसीबीच्या यशाचा नवा अध्याय :- कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकत स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. विराट कोहलीच्या अनुभवासह युवा खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आपली ताकद सिद्ध केली. या विजयानंतर बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून संघाच्या यशाचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement