Type Here to Get Search Results !

जाहीर नोटीस

तमाम लोकांना तसेच सर्व वित्तीय संस्था, बँका, सरकारी पतसंस्था, सहकारी बँका, निमसरकारी कार्यालये, वित्तीय महामंडळे, आयुबखान मेहबुबखान पठाण व इतर सर्व रा. जनता वसाहत, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव, तसेच त्यांचे वारस, कायदेशीर प्रतिनिधी व कुटुंबीय यांना, आमचे अशिल अफजल खान फत्ते खान व इतर सर्व रा. नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव यांनी दिलेल्या माहिती, सूचना व अधिकारानुसार मी ॲंड. पी. बी. पाटील, या जाहीर नोटीसीद्वारे कळवितो की,

मिळकतीचे वर्णन :

मौजे होळ, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील शेतजमीन गट क्रमांक ६९/ब, क्षेत्र १ हे. २० आर व क्षेत्र २० आर, असे एकूण क्षेत्र १ हे. ४० आर असून त्याच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहेत :

पूर्वेस : गडद नदी

पश्चिमेस : गट क्र. ६९/ब शिल्लक क्षेत्र

दक्षिणेस : घुसर्डी रस्ता

उत्तरेस : अलीयार खान यांची शेतजमीन

वरील शेतमिळकतीपैकी पूर्वेकडील १ हे. क्षेत्र आयुबखान मेहबुबखान पठाण व इतर यांच्या नावे नोंद आहे. तथापि, सदर क्षेत्रापैकी पश्चिमेकडील ४० आर क्षेत्र हे नोटीस देणाऱ्यांच्या ताब्यात, कब्ज्यात व उपभोगात असूनही त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर चुकीने करण्यात आलेली आहे.

सदर चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी नोटीस देणारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्तीची कार्यवाही करणार आहेत.

तथापि, त्यापूर्वी आयुबखान मेहबुबखान पठाण व इतर हे सदर शेतमिळकत विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. असे झाल्यास नोटीस देणाऱ्यांच्या ताब्यातील क्षेत्र बेकायदेशीररीत्या विक्री होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सर्व संबंधितांना जाहीर इशारा देण्यात येतो की, कोणीही आयुबखान मेहबुबखान पठाण व इतर यांच्याशी वरील नमूद शेतमिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचा खरेदी-विक्री, तारण, गहाण, दान, बक्षीसपत्र अथवा अन्य कोणताही व्यवहार करू नये.

तरीही कोणी असा व्यवहार केल्यास तो व्यवहार आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. तसेच असा व्यवहार बेकायदेशीर समजला जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची राहील. त्याबाबत आमचे अशिल कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.

करीता ही जाहीर नोटीस देण्यात येत आहे.

सदर जाहीर नोटीस आमच्या अशिलांनी दिलेल्या माहिती, कागदपत्रे व अधिकार यांच्या आधारे, आज रोजी माझ्या स्वाक्षरीने व अशिलांच्या खर्चाने प्रसिद्ध करण्यात येत आहे.


शिक्का                               सही/- 

                     (ॲंड. पी. बी. पाटील) 9860125389

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement