भाजपा नेते तथा अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांनी राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीपासूनच सामाजिक बांधिलकी जपत युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. तरुणांना योग्य दिशा, शिक्षण, करिअर आणि समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी ते सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे मत युवा नेते, 'दर्पण मराठी न्यूज लाईव्ह'चे मुख्यसंपादक तथा 'कोकण प्रदेश न्यूज'चे सहसंपादक हसीबुर शेख यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, मुन्नाभाऊ भांडारकर यांनी केवळ राजकारणापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता युवकांना प्रोत्साहन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, शेतकरी हितासाठी कार्य करणे आणि सामाजिक सलोखा जपणे यासारख्या विधायक कामांना प्राधान्य दिले आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी आहे.
युवा पिढीला सकारात्मक विचार, शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, समाजहिताची त्यांची तळमळ आणि लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून युवकांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास हसीबुर शेख यांनी व्यक्त केला.
* शब्दांकन - फारूख शेख (95037 31248)



Social Plugin