* दहावी-बारावीतील गुणवंत, अग्निवीर व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
नगरदेवळा / फारूख शेख :- भाजप नेते तथा अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त व 1976 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेल्या अनुप कृषी सेवा केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत सोमवार, 8 जून २०२६ रोजी नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटात दहावी - बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळास्तरावर प्रथम ते पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयाजवळील चौधरी मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या मुन्नाभाऊ भांडारकर यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते मुन्नाभाऊ भांडारकर व अनुप कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सरदार एस. के. पवार विद्यालय नगरदेवळा, कै. अमिषकुमार त्रिभुवन गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय नगरदेवळा, बाळद, नेरी, सार्वे, घुसर्डी, निपाणे, बदरखे, खाजोळे आणि पिंप्री आदी नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांमधील दहावीतील यशस्वी विद्यार्थी तसेच सरदार एस. के. पवार विद्यालय नगरदेवळा येथील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निवीर व पोलीस भरती 2026 मध्ये नगरदेवळा येथील निवड झालेल्या युवकांचाही गौरव करण्यात येणार आहे.
पोलिस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नगरदेवळा येथील एकमेव असलेल्या महिला वाचनालयातील विद्यार्थीनींना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
दरम्यान, 15 जून रोजी मुन्नाभाऊ भांडारकर यांचा वाढदिवस असून, त्यानिमित्त 16 जून रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिका राबविण्यात येत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण, करिअर आणि संस्कार यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून परिसरातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. उमेश काटकर - 99752 81100, विलास भामरे (95511 10110), कडू नाना पाटील (88881 52018) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Social Plugin