* भाजप नेते प्रणय (मुन्नाभाऊ) भांडारकर यांचे आवाहन
आज मी आपल्यासमोर राजकारणी म्हणून नव्हे, तर आपल्या गावाचा, आपल्या मातीत वाढलेल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून उभा आहे. नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी एक नवी दिशा देण्याच्या उद्देशाने मी आपल्यासमोर आलो आहे.
मागील दोन दशकांपासून या भागातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांशी झुंज देत आहेत. गावागावातील रस्ते आजही खड्ड्यांनी भरलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बेरोजगारीमुळे युवकांना गाव सोडून बाहेर मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कामासाठी जावे लागत आहे. शेतीसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत. अनेक विकासकामे अजूनही कागदावरच आहेत.
या परिस्थितीत बदल घडविण्याचा निर्धार करूनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
माझा राजकारणात येण्याचा उद्देश सत्ता, पद किंवा आर्थिक लाभ मिळविणे नाही. देवाच्या कृपेने मला कोणत्याही विकासकामातून टक्केवारी घेण्याची किंवा राजकारणातून पैसा कमविण्याची गरज नाही. उलट समाजाने मला खूप काही दिले आहे. आता समाजाचे देणे फेडण्याची वेळ आली आहे.
मी आपल्याला स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की, विकासकामांमध्ये कोणतीही टक्केवारी स्विकारली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" या तत्त्वावर ठाम राहून मी काम करेन.
माझे स्वप्न केवळ निवडून येण्याचे नाही, तर नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटाला विकासाच्या बाबतीत आदर्श बनविण्याचे आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी मी विकास आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये दर्जेदार रस्ते, मजबूत पूल, शेतीसाठी आवश्यक सुविधा, जलसंधारण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, महिलांसाठी कौशल्य विकास, वाचनालये, अभ्यासिका, क्रीडा सुविधा आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य दिले जाईल.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून उपलब्ध असलेल्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ आपल्या भागात आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. जिल्हा नियोजन समिती, विविध विभागांचे निधी, राज्य व केंद्र शासनाच्या योजना यांचा प्रभावी पाठपुरावा करून विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
मी प्रत्येक गावात नियमित भेटी देईन. नागरिकांच्या समस्या थेट ऐकेन. प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करेन. प्रत्येक विकासकामाची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करेन.
माझा विश्वास आहे की, विकास हा कोणत्याही जाती, धर्म, पक्ष किंवा गटाचा नसतो. विकास हा सर्वांचा अधिकार असतो. त्यामुळे "सबका साथ, सबका विकास" या विचारानेच मी काम करणार आहे.
आज मी आपल्याकडे केवळ एकच मागणी करीत आहे - मला एक संधी द्या.
मागील 35 ते 40 वर्षांत जे झाले नाही, ते पुढील 5 वर्षांत करून दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. आपल्या विश्वासाच्या बळावर नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटाचा चेहरामोहरा बदलवून दाखविण्याची माझी तयारी आहे.
आपला विश्वास, आपले आशीर्वाद आणि आपले सहकार्य हेच माझे सर्वात मोठे बळ आहे.
एक संधी द्या... विकास करून दाखवतो!
* संकलन - केपी न्यूज ब्युरो.


Social Plugin