Type Here to Get Search Results !

उद्योग, समाजकारण आणि विकासदृष्टीचा संगम : प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ भांडारकर

* उद्योगातून उभा राहिलेला विकासाचा चेहरा अन् राजकारणातील उगवता तारा

खाद्या व्यक्तीचे मोठेपण केवळ त्याच्या पदावरून किंवा संपत्तीवरून ठरत नसते, तर समाजासाठी असलेल्या त्याच्या तळमळीवर, विकासासाठी असलेल्या दूरदृष्टीवर आणि लोकांशी असलेल्या नात्यावर ठरत असते. नगरदेवळा - बाळद परिसरात आज अशाच एका युवा नेतृत्वाची चर्चा होत आहे. उद्योग, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर हे आज परिसरातील युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

15 जून रोजी त्यांचा वाढदिवस असून, या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहिले असता एक जिद्दी उद्योजक, संवेदनशील समाजसेवक आणि विकासाला प्राधान्य देणारा राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख ठळकपणे समोर येते.

* शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आधारवड :- 1976 पासून सुरू असलेली "अनुप कृषी सेवा" ही केवळ एक व्यावसायिक संस्था नाही, तर हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र आहे. या व्यवसायाला जवळपास पाच दशकांची परंपरा लाभली असून त्या परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत मुन्नाभाऊ भांडारकर यांनी शेतकऱ्यांशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.


व्यवसायातून केवळ आर्थिक प्रगती साधण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे हा त्यांचा दृष्टिकोन राहिला आहे. त्यामुळेच त्यांना परिसरात एक विश्वासार्ह उद्योजक म्हणून मान मिळतो.


* समाजकारणातून घडलेले नेतृत्व :- मुन्नाभाऊ भांडारकर यांची ओळख फक्त उद्योजक म्हणून मर्यादित नाही. सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शैक्षणिक कार्यक्रम, युवकांना मार्गदर्शन, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभाग या माध्यमातून त्यांनी समाजाशी सातत्याने संवाद कायम ठेवला आहे.


समाजातील विविध घटकांशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्ती यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन मिळत आहे.


* राजकारणात विकासाचा अजेंडा :- राजकारणात प्रवेश करतांना त्यांनी सत्तेपेक्षा विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि युवा नेते अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय वाटचाल अधिक सक्षम केली. त्यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणा, प्रशासनाची जाण, विकासाची दृष्टी आणि सर्वसमावेशक विचारसरणी यांचा उत्तम मिलाफ दिसून येतो.


* टक्केवारी नव्हे, विकास हवा :- आजच्या राजकारणात अनेकदा विकासापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला महत्त्व दिले जाते. मात्र मुन्नाभाऊ भांडारकर यांनी विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीला थारा नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" या विचारसरणीवर विश्वास ठेवत पारदर्शक प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याचा त्यांचा निर्धार आहे.


* युवकांच्या आशांचा चेहरा :- नगरदेवळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि ऐवढेच नव्हे तर नगरदेवळ्याला लागून असलेल्या मराठवाडा परिसरातील युवकांमध्ये देखील मुन्नाभाऊ भांडारकर यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. शिक्षण, रोजगार, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाकडे आजचा युवा वर्ग आशेने पाहत आहे. कारण ते केवळ आश्वासने देत नाहीत, तर कृतीतून विश्वास निर्माण करतात.


* विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा :- रस्ते, पूल, शेतीसाठी सुविधा, रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि मूलभूत सोयीसुविधा या विषयांवर त्यांची स्पष्ट भूमिका आहे. गावागावांपर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण करीत आहे. राजकारणातील उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून आगामी काळात ते विकासाचे नवे मॉडेल उभे करतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येतो.


* वाढदिवसानिमित्त शुभेच्छा :- प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विकासासाठीची तळमळ या गुणांच्या जोरावर प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी उराशी बाळगलेली विकासाची स्वप्ने साकार व्हावीत आणि समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची त्यांची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी, हीच सदिच्छा.

- फिरोज पिंजारी (मुख्य संपादक, दै. कोकण प्रदेश न्यूज)

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement