Type Here to Get Search Results !

संघर्षातून यशाचे शिखर गाठणारे शिवाजी माळी...वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

* प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासकीय क्षेत्रात उमटविला ठसा

* सेवानिवृत्तीनंतरही शेतीतून समाजासमोर आदर्श निर्माण

खोपोली / प्रतिनिधी :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे खोपोली येथील ज्येष्ठ नागरिक तथा खोपोली नगर परिषदेचे माजी प्रशासकीय अधिकारी शिवाजी शंकर माळी यांचा वाढदिवस 1 जून रोजी उत्साहात साजरा होत असून, यानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साध्या कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी माळी यांनी लहानपणापासूनच संघर्षमय परिस्थितीचा सामना करीत शिक्षण पूर्ण केले. आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल केली. त्यांच्या चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली.


खोपोली नगर परिषदेत ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर म्हणून सेवेला सुरुवात करणाऱ्या शिवाजी माळी यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर विविध महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली. सिटीबस मॅनेजर, टॅक्स सुपरिटेंडंट आणि ऑफिस सुपरिटेंडंट या पदांवर कार्यरत असतांना त्यांनी प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.


प्रत्येक पदावर काम करतांना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव जपली. सहकाऱ्यांशी आत्मीयतेचे संबंध, सर्वसामान्य नागरिकांप्रती संवेदनशीलता आणि कामावरील निष्ठा यामुळे ते प्रशासनातील विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्यकाळात अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली.


नोकरीच्या जबाबदाऱ्यांसोबतच त्यांनी कुटुंबासाठी खंबीर आधारस्तंभाची भूमिका निभावली. मुलांच्या शिक्षणापासून कुटुंबाच्या प्रगतीपर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या जीवनप्रवासात संघर्ष आणि यश यांचे सुंदर संतुलन पाहायला मिळते.


सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी कार्याचा ध्यास कायम ठेवला आहे. आपल्या मूळ गावी जयराम स्वामींचे वडगाव येथे शेती व्यवसायात सक्रिय सहभाग घेत त्यांनी आधुनिक आणि प्रगत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी कृषी क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


वाचनाची आवड, संयमी स्वभाव, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे शिवाजी माळी हे आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील विविध घटकांना होत असून, ते सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.


त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, मित्रपरिवार, माजी सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


यावेळी भावना व्यक्त करतांना त्यांचे धाकटे बंधू तथा पत्रकार दिनकर भुजबळ म्हणाले की, संघर्षातून घडलेला शिवाजी माळी यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.


कर्तृत्व, संघर्ष आणि यश यांचा सुंदर संगम असलेले शिवाजी माळी यांचे व्यक्तिमत्त्व आजही अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. 

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement