* प्रणय (मुन्नाभाऊ) भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची तरुणांची मागणी
* वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर : नगरदेवळ्यासह गटातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हालचालींना व
नगरदेवळा / फारूख शेख :- पाचोरा तालुक्यासह नगरदेवळा गटातील विविध ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत शुक्रवारी (12 जून) जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरक्षण निश्चित झाल्यामुळे संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून गावागावांत निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नगरदेवळा ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा लोकनियुक्त सरपंचा व एकूण 17 सदस्यांची निवड होणार असून विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मागील निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये चुरशीची लढत झाली होती. त्यामध्ये आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सरपंच व उपसरपंचपदासह गेली पाच वर्षे सत्तेची सूत्रे आघाडीच्या हाती होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध पक्षांच्या आघाड्यांबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे, अशी प्रतिक्रिया विलास सोनवणे यांनी व्यक्त केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील विविध समाजघटकांतील तरुण वर्गाने भाजप नेते तथा नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार म्हणून चर्चेत असलेले युवा नेतृत्व प्रणय (मुन्नाभाऊ) भांडारकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शिक्षण, शेतकरी हित, युवकांना रोजगार, सामाजिक उपक्रम आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे मुन्नाभाऊ भांडारकर यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात युवक एकवटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरदेवळा ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार मुन्नाभाऊ भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभे करून निवडणूक लढविण्यात यावी, अशी मागणी अनेक तरुणांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. गावाच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना युवकांमध्ये व्यक्त होत आहे.
वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरदेवळ्यासह संपूर्ण गटातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी काळात स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि उमेदवारीची चाचपणी अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.।


Social Plugin