Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त डॉं. अर्चना मेडेवार यांचा वृक्षारोपण उपक्रम

* आयआयटीएम-एमएमपी, ग्वालियर येथे दहा वृक्षांचे रोपण

* "एक तरी झाड लावू या, वृक्षसंवर्धन करू या"चा संदेश

ग्वालियर / प्रतिनिधी :- राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आयआयटीएम-एमएमपी, ग्वालियर येथे लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या अध्यक्षा तथा ब्रँड अॅम्बेसेडर डॉं. अर्चना मेडेवार यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी त्यांच्या मित्रपरिवारानेही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली.

डॉं. अर्चना मेडेवार या दरवर्षी राष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुमारे एक हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प राबवत असतात. मात्र, यावर्षी तीव्र उष्णता आणि पाण्याच्या टंचाईमुळे वृक्षांचे संवर्धन लक्षात घेऊन प्रतीकात्मक स्वरूपात दहा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


"एक तरी झाड लावू या, वृक्ष संवर्धन करू या" हा संदेश देत त्यांनी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. वाढते तापमान, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉं. अर्चना मेडेवार यांनी सर्व पर्यावरणप्रेमींना राष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत, भविष्यात अधिकाधिक वृक्षारोपण करून हिरवागार आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement