Type Here to Get Search Results !

पाचोरा पीपल्स बँकेतर्फे सभासद पाल्यांचा गुणगौरव

* दहावी, बारावी, पदविका, पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

* 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुणपत्रिका जमा करण्याचे आवाहन

पाचोरा / प्रतिनिधी :- दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. पाचोरा यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सभासद पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा येथील बँकेच्या सभागृहात होणार आहे. 

सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाची दखल घेत गुणवंत विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.


सत्कारासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये संबंधित परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र राहणार आहेत. सत्कारासाठी इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत सरासरी किमान 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, कोणत्याही पदविका अभ्यासक्रमात किमान 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात किमान 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी पात्र राहतील. 


गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत 6 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या जवळच्या शाखेत जमा करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिकांचा सत्कारासाठी विचार केला जाणार नसल्याचे बँकेने कळविले आहे.


गुणपत्रिकेच्या सत्यप्रतीसोबत विद्यार्थ्याचा निवास पत्ता तसेच संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रे जमा करून या गौरव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन ॲंड. अतुल संघवी, व्हा. चेअरमन प्रशांत अग्रवाल व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement